विचार.....
- आपण जसं म्हणतो श्रीमंताचा मुलगा वाया गेलेला असतो त्याचा बापाने सर्वकाही करून ठेवलेला असते आणि तो मजा मारत असतो....आजची परिस्थिती धार्मिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या सारखीच आहे.....इकडे 'श्रीमंताचा मुलगा' ऐवजी आपण आणि बापाच्या जागी आपले पूर्वज. पूर्वजांनी हा देश घडवला... प्राण गमावले.... स्वतंत्र देश दिला आणि आपण आता फक्त मजा मारतो आहोत....
- आपण रात्र होते म्हणून झोपत नाही तर आपल्याला स्वतंत्र देश मिळाला आहे आणि सैनिक सीमेवर पहारा देत आहेत म्हणून.
- परिस्थिती किंवा अडचण अशी आहे कि जन परिवर्तन करण्यासाठी घाबरत आहे....मिटल्याने किंवा तोंड फिरवल्याने ही स्थिती बदलणार नाही...आणि नागरिक हेच करत आहेत....
- सहन करण्याची घाणेरडी सवय लागली आहे....
- आपल्याला फक्त आपल्या आई वडिलांनी नाही घडवलं. आपल्याला समाज, धर्म, देश यांनी ही घडवलं आहे....आपण जसे आई वडिलांचे तसेच समाजाचे, देशाचे ऋणी आहोत....मोठेपणी फक्त आईवडिलांचे ऋण फेडू नका तर समाजाचे ही फेडा.....
No comments:
Post a Comment